Ghodegaon Accident: रस्ता ओलांडताना काळाचा घाला! अपघातात पाथर्डीच्या ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
सोनई : छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावर घोडेगावजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.नंदा गोरक्षनाथ नजन (रा. शिराळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे महिलेचे नाव आहे.रविवारी सायंकाळी. 7.45 वा. सुमारास महामार्गावर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर घोडेगाव परिसरात अपघात झाला. या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली.
महिलेचा पुतण्या कानिफनाथ नजन यांनी रुग्णवाहिकेद्वारे तातडीने अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच रात्री 9.30 वा. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांनी फोनद्वारे सोनई पोलिसांना दिली. त्यानुसार सोनई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार बी.एम. तागड करीत आहेत.





