घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य 63 तासांनी संपले; किती जणांचा झाला मृत्यू?

Mumbai Ghatkopar Hording| मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. याप्रकरणी मागील काही दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य अखेर 63 तासांनी संपले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची पाहणी करत हे बचवकार्य संपल्याची घोषणा केली.
या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते. जखमींवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळले होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आशियातील सर्वात मोठे होर्डिंग अशी नोंद याची होती.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर Mumbai Ghatkopar Hording|
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. यशीवाय घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट असलेला मालक भावेश भिडेचा मुंबई पोलीसांची सात पथक शोध घेत आहेत.
कायदा होर्डिंग पाडून टाकण्याची कार्यवाही Mumbai Ghatkopar Hording|
दरम्यान, मुंबईत घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतर इतर शहरात देखील खबरदारी घेतली जात आहे. घाटकोपरसारख्या दुर्घटना अन्यत्र होऊ नयेत, म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यावर अथवा महामार्गांवरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे अर्थात होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तपासणीअंती आढळून आलेले बेकायदा होर्डिंग पाडून टाकण्याची कार्यवाही करावी.
तसेच संबधित होर्डिंग्जमालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहु माळी यांनी सर्व महापालिका आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
हेही वाचा:
ऐकावं ते नवलं! चक्क तिरडीवरून निवडणूक अर्ज भरण्यासाठी पोहचला उमेदवार; तर स्मशानभूमीत…





