घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; मुख्यत्र्यांकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर

Mumbai Ghatkopar| मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अपघातातील मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले असून यातील 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली तब्बल 80 वाहने अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, यातील 13 जणांचा मृत्यू राजवाडी रुग्णालयात आणि एका व्यक्तीचा मृत्यू सायनन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. तसेच मुंबईतील सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
घटना कशी घडली ? Mumbai Ghatkopar|
मुंबई भागात काल दुपारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत 50हून अधिक जणांना बाहेर काढले आहे.
हेही वाचा:
लोकसभा निवडणूकांबाबत ममता बॅनर्जींचा मोठा दावा; भाजपला किती जागा मिळणार केले स्पष्ट





