Ghanshyam Darwade : बिग बॅास मराठी ५ या कार्यक्रमाने छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दरोडे घराघरात पोहचला. खरंतर बेधडक पद्धतीने खूप कमी वयात राज्यातील राजकारणावर आपलं मत मांडणारा घनश्याम चर्चेत आला. पण त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती बिग बॅास या रियालटी शोने. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीमुळे घनश्याम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या हेल्थबाबत महत्वाची माहिती सांगितली आहे. बिग बॉसमधील घनश्यामचा खेळ चाहत्यांना खूप आवडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहतो. अनेक वेळा त्याच्या कमी उंचीमुळे त्याला ट्रोल करण्यात येते. एका मुलाखतीत त्याने किडणी, यकृत आणि फुफ्फुसा संबधित आजार असल्याचा मोठा खुलासा केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. त्याला अजूनही यकृत आणि किडनीचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले आहे. लहान उंचीमुळे त्याला कायम डावलले जायचे. त्याला अजूनही यकृत आणि किडनीचा त्रास आहे. मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्याला कायम साथ दिली. त्यामुळे आयुष्यात मी मोठा झाला. याविषयी बोलताना त्याने आता मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच असल्याचे सांगितले आहे. सातवीत कळालं की…. सातवीत असताना घनश्यामला आजाबद्दल कळलं. त्याला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तसेच त्याला थायरॉईड देखील आहे. त्याच्या यकृत आणि फुप्फुसांना सूज आहे आणि किडनीलाही त्रास आहे. यामुळे रक्त शुद्ध करण्यासाठी इंजेक्शन घ्यावं लागतं. कारण माझ्या शरीरात आपोआप रक्त तयार होत नाही, असा मोठा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे. छोटा पुढारी म्हणून घनश्याम दरोडेला महाराष्ट्रात ओळखले जाते. याशिवाय बिग बॅासमुळे देखील त्याला मोठी प्रसिद्ध मिळाली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. तो आपल्या चाहत्यांसोबत सतत कनेक्ट राहून व्हिडीओ फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असतो. सध्या तो ‘शिट्टी वाजली रे’ या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळत आहे. हेही वाचा : बलुच दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला ; बीएलएने २९ सैनिकांना ठार मारल्याचा दावा