महिला आरक्षण विधेयक मार्गी लावा – देवगौडा
Updated On:

बंगलुरू: महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करणारे विधेयक अनेक वर्षे प्रलंबीत आहे. हे विधेयक मोदींनी त्वरीत मार्गी लावावे, असे आवाहन माजी पंतप्रधान देवगौडा यांनी केले आहे.
या आरक्षण विधेयकाला आपण पंतप्रधान असतानाच्या काळात चालना दिली होती पण, त्यानंतर हा विषय मागे पडला आहे, आता पंतप्रधान मोदींनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.
महिला सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच देश प्रगती करू शकेल असा विश्वास देवगौडा यांनी व्यक्त केला आहे.





