जिनिलीयाच्या ‘त्या’ कृतीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं; व्हिडिओ व्हायरल

मुंबई – अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) तिच्या अभिनयासह प्रेमळ स्वभावासाठी देखील ओळखली जाते. हिंदीसह मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती काही लहान मुलांसोबत दिसत आहे. मात्र यावेळी जिनिलीयाच्या कृतीचे विशेष कौतुक केले आहे.
जिनिलीया शुक्रवारी दुपारी आपल्या मैत्रिणींबरोबर वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. याच दरम्यानचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यावर जिनिलीया तिच्या गाडीची वाट पाहत उभी होती. यावेळी रस्त्यावर उभी असणारी दोन मुलं “तू हिरोईन आहेना?” असं म्हणत तिच्या दिशेने येऊ लागतात. त्यांचा आवाज ऐकताच जिनिलीया त्यांच्याजवळ येते आणि त्यांची विचारपूस करते.
View this post on Instagram
“तुम्ही मला कसं ओळखता?”, “माझा कोणता चित्रपट पाहिलात? मला नाव सांगा…” असे प्रश्न जिनीलिया मुलांना विचारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने एका लहान मुलीचा हात धरला होता. तिचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिचे अनेकजण कौतुक करत आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी “जिनिलीया मनाने खरंच चांगली आहे”, “तिच्याऐवजी दुसरी कोणी अभिनेत्री असती, तर त्या मुलांच्या बाजूला थांबली देखील नसती”, अशी कमेंट केली आहे. दरम्यान, जिनिलीया नुकतीच ‘ट्रायल पीरेड’ चित्रपटात झळकली होती.





