गौतमी पाटीलने अखेर लग्नाबद्दल सांगूनच टाकलं; म्हणाली, “लग्न ठरेल तेव्हा मी…’

मंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. दरम्यान, या सगळ्यात काही दिवसांपूर्वी गौतमीने पहिल्यांदाच आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं होत. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती.
‘मला लग्न करायचं आहे. मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन’. असं यावेळी गौतमी पाटील म्हणाली.
दरम्यान, आता पुन्हा एकदा गौतमीने तिच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत गौतमीने लग्न कधी करणार याविषयी मौन सोडलं आहे. या मुलाखतीत गौतमीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने अखेर उत्तर दिलं आहे.
ती म्हणाली की, “अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगेन. सर्वांना पत्रिकाही देईन..’, असं उत्तर तिने दिल आहे. गौतमीच्या या उत्तराने आता चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे. सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लोक लांबून लांबून गौतमीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाही’ या गाण्यावर नृत्य करत असताना तीने अश्लील हावभाव केले होते. त्यावरून तीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तीला विदर्भरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. गौतमी पाटील आता मोठी सेलिब्रिटी झाली असून तीच्या कार्यक्रमाला पोलीसांचाही बंदोबस्त असतो.





