भरपावसात छमछम गाण्यावर गौतमीने धरला ठेका! मोहात टाकणारा डान्स पाहून चाहते फिदा, Video व्हायरल…

Gautami Patil Dance Video : सबसे कातील गौतमी पाटील हिचे लावणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा तिने शेअर केलेल्या डान्स व्हिडिओमुळे तिच्यावर टीका केली जाते. मात्र, नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमे्ंटसचा पाऊस पाडला आहे. या व्हडिओत गौतमी पावसात भिजण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.
अलका याग्निक यांच्या “छमछम नाचूंगी” या गाण्यावर गौतमीने भर पावसात डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने साडी नेसलेली असून पावसाच्या सरींमध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धूमाकूळ घातला आहे. गौतमीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा कलाकार म्हणून ओळखली जाते. तिचे लाखो लाहते आहेत. ती नेहमी आपले डान्सचे व्हिडिओ इन्स्टावरून शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतात आंबट शौकीन नावाच्या मराठी चित्रपटात गौतमीने तंबू पिरमाचा पेटला या आयटँम साँगवर भन्नाट डान्स केला आहे. तिच्या या गाण्याील ठसकेबाज अदांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय गौतमीने “कृष्ण मुरारी” या गवळण गाण्यातील ती दिसली होती. तसेच तिचे बापाचा बाप येतोय हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं आहे.
गौतमी पाटील हिचे मूळ गाव धूळे जिल्ह्यातील शिंदखेडा हे गाव आहे. तिचे बालपण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत गेले. तिचे आई वडील तिला लहाणपीच सोडून गेले. आर्थिक अडचणींमुळे तिने शिक्षण अर्धवट सोडून नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर गौतमीचे फॅन फॅालोविंग मोठे आहे.
हेही वाचा: श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; फॅमिली मॅन ३ या दिवशी होणार रिलीज





