Gambhir Coach Pressure : गौतम गंभीर यांची खुर्ची धोक्यात? BCCI च्या अधिकाऱ्यांसह ड्रेसिंग रूममध्ये नाराजी; श्रीलंका दौऱ्यावर भवितव्य अवलंबून
Gambhir Coach Pressure : बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी आणि टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही गंभीर यांच्या कोचिंग शैलीवर अनौपचारिकपणे नाराजी व्यक्त करत आहेत.

Gautam Gambhir Head Coach Team India Future BCCI Dressing Room Discontent Sri Lanka Series : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासाठी सध्या परिस्थिती कठीण झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, वर्षापूर्वी बीसीसीआयकडून (BCCI) गंभीर यांना मिळणारा पाठिंबा आता कमी होऊ लागला आहे. बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी आणि टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही गंभीर यांच्या कोचिंग शैलीवर अनौपचारिकपणे नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते, ज्यामुळे त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदावर दबाव वाढला आहे.
हार स्वीकारण्याऐवजी दोषारोप?
रिपोर्टनुसार, संघाच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वतः स्वीकारण्याऐवजी खेळाडू, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलंन्स किंवा सपोर्ट स्टाफवर दोष ढकलण्याचा गंभीर यांचा प्रयत्न असतो, असे बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांचे मत आहे. इंग्लंड दौरा आणि कसोटी मालिकेतील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर गंभीर यांच्यावर टीका होत आहे. सुरुवातीला संघात कोणताही ‘बदल’ (Transition) करण्याची गरज नाकारणाऱ्या गंभीर यांनी आता पराभवाचे खापर ‘संघातील बदलाच्या टप्प्यावर’ फोडल्याने बोर्ड सदस्यांचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाला आहे.
Reports claim senior players have approached BCCI over Gautam Gambhir’s coaching style! 🇮🇳🚨
• Dressing room tension? Unofficial reports suggest senior Indian players have expressed concerns to BCCI members regarding head coach Gautam Gambhir’s rigid management approach. 💬⚖️… pic.twitter.com/8e0NJ3MMJX
— Cricket Hub (@Anurag9793) August 3, 2026
श्रीलंका दौरा ठरणार निर्णायक!
According to the report, Gautam Gambhir’s coaching position is reportedly under threat due to the “passing the buck” narrative.
The report also claims that several senior Indian players have approached BCCI officials to express concerns about his coaching style.#IndvsSl pic.twitter.com/UrrpHNbYUg
— CricInformer (@CricInformer) August 3, 2026
सुरुवातीला बीसीसीआयने गंभीर यांना मनपसंत सपोर्ट स्टाफ निवडण्याची पूर्ण मुभा दिली होती, परंतु त्याचा योग्य वापर झाला नसल्याची भावना बोर्डात आहे. अशा स्थितीत आगामी श्रीलंका दौरा हा गंभीर यांच्या भविष्याचा फैसला करू शकतो. या मालिकेत संघ निष्प्रभ ठरल्यास त्यांच्या पदावर मोठे संकट येऊ शकते.
मात्र, २०२७ पर्यंत असलेला करार आणि २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकाला (ODI World Cup) अवघा एक वर्ष उरला असल्याने लगेच नवा प्रशिक्षक शोधणे बीसीसीआयसाठी सोपे नाही. तरीही या मालिकेतील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





