#IPL2024 : गौतम गंभीर ‘KKR’ कडे परतणार
Updated On:

कोलकाता :- लखनौ सुंपर जायंट्स संघाने ऑस्ट्रेलियाच्या जस्टीन लॅंगर यांच्याशी करार केला. त्यामुळे आता त्यांच्याकडे फलंदाजीचा सहायक प्रशिक्षक व मेंटॉर असलेला भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्सशी (केकेआर) करारबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थात लखनौ संघाकडून ही शक्यता फेटाळून लावली असली तरीही पुढील स्पर्धेस अद्याप 8 ते 9 महिने असल्याने मधल्या काळात काहीही घडू शकते, असे संकेत खुद्द गंभीरनेच दिले आहेत.
गंभीर हा एक खेळाडू म्हणून केकेआरशी पहिल्यापासूनच जोडला गेला होता. तसेच त्याचे संघ मालक व प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानशीही सलोख्याचे संबंध असल्याने पुढील मोसमात गंभीर त्यांच्या संघाचा मेंटॉर म्हणून काम करू शकतो.





