IND vs ENG : ‘तो संघातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी…’, सात वर्षांनी संघात कमबॅक करणाऱ्या करुण नायरचं गंभीरकडून कौतुक

IND vs ENG Test Series Gautam Gambhir praises Karun Nair : भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया परदेश दौऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत काही नवीन आणि काही पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. या दौऱ्यात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे करुण नायर, ज्याचे प्रशिक्षक गौतम गंभीरने कौतुक केले.
गौतम गंभीरकडून करुण नायचे कौतुक –
करुण नायर बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे त्याने टीम इंडियामध्ये आपले स्थान पुन्हा मिळवले. दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी करुण नायरचे खूप कौतुक केले आहे. त्याने त्याच्या पुनरागमनाला प्रेरणादायी म्हटले आहे.
संघातील प्रत्येकासाठी ते प्रेरणादायी –
A comeback story with Karun Nair 🔝
P.S. – A special message from KL Rahul 👌#TeamIndia | #ENGvIND | @karun126 | @klrahul pic.twitter.com/PeYCsNtnxv
— BCCI (@BCCI) June 12, 2025
गौतम गंभीर म्हणाला, “पुनरागमन कधीच सोपे नसते, सात वर्षांनंतर जो परतला आहे, त्याचे गेले वर्ष खूप चांगले गेले आहे. तू (करुण नायर) जितक्या धावा केल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कधीही हार न मानण्याची वृत्ती तुझ्यात आहे. त्यामुळे तू संघात परतलास आणि या संघातील प्रत्येकासाठी ते प्रेरणादायी आहे. त्यामुळे करुण नायरचे स्वागत आहे.”
हेही वाचा – WTC Final 2025 : मिचेल स्टार्कने रचला इतिहास! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोडला शमीचा विक्रम
करुण नायरही उत्साहित –
Words that inspire 💬
𝗛𝘂𝗱𝗱𝗹𝗲 𝗧𝗮𝗹𝗸, 𝗳𝘁. 𝗛𝗲𝗮𝗱 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 & 𝗖𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻!#TeamIndia | #ENGvIND | @GautamGambhir | @ShubmanGill
Watch 🔽
— BCCI (@BCCI) June 12, 2025
करुण नायर देखील बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये परतल्याबद्दल खूप उत्साहित आहे. भारताकडून पुन्हा खेळण्याबद्दल तो म्हणाला, “पुन्हा अशी संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की एकदा मी मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर माझ्या मनात खूप भावना असतील पण सध्या मी त्या व्यक्त करू शकत नाही.”
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिधकृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.





