Gautam Adani Meets Sharad Pawar : अजित दादांच्या निधनानंतर गौतम अदानी सिल्व्हर ओकवर; पवार कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट
Gautam Adani Meets Sharad Pawar : गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध

Gautam Adani Meets Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
अनेक दिग्गज मंडळींनी पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर देशातील नामवंत उद्योगपती गौतम अदानी यांनी देखील शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
अदानी हे जवळपास 45 मिनिटे शरद पवारांच्या निवासस्थानी होते, त्यामुळे अजित पवारांच्या अपघातासंदर्भाने व कौटुंबीक चर्चाही त्यांनी केल्याची माहिती आहे. या भेटीत अदानी यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. Gautam Adani Meets Sharad Pawar
तसेच अपघाताबाबत सविस्तर माहिती घेत पवार कुटुंबाला धीर दिला. गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध आहेत. अजित पवार यांचेही अदानींसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.
Ali Daoud Amich: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या मोठ्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा ‘मास्टरमाइंड’ ठार
शारदा प्रतिष्ठाच्या संस्थेतील एआय सेंटरच्या कार्यक्रमाला हजेरी
काही दिवसांपूर्वी गौतमी अदानी यांनी बारामतीमधील शारदा प्रतिष्ठाच्या संस्थेतील एआय सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती.
यावेळी, सुप्रिया सुळेंनी गौतम अदानी यांचं भरभरुन कौतुकही केलं होतं. गौतमभाई हे मला मोठ्या भावासारखे आहेत, मी हक्काने त्यांना सुख आणि दुखाच्या गोष्टी सांगत असते, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते. Gautam Adani Meets Sharad Pawar :
दरम्यान, कठीण प्रसंगातही राज्याची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या मातोश्रींची भेट घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाल्या होत्या.
हेही वाचा :
Clashes in Pakistan: पाकिस्तान-बलुचिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष पेटला ; 200 पाक नागरीकांचा मृत्यू






