खान्देशातील गौरी गणपती पुजन व विधी (व्हिडिओ)

Updated On:

पाचोरा (विजय बाविस्कर)- महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये आणि काही अन्य राज्यांमध्ये भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात.

कोकणात तो ‘गौरी-गणपती’ या जोड नावानेच हा सण साजरा करण्यात येतो. तर पश्चिम महाराष्ट्रात त्याला ‘गौरी सण’ असे संबोधतात. खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात याला महालक्ष्मीचा सण असे म्हटले जाते.

प्रत्येक प्रांतात आरास व उत्सवाची प्रथादेखील थोडी निराळी आहे. परंतु भक्तिभाव आणि उत्साह मात्र सारखाच असतो, असे हा सण साजरा करणाऱ्या महिलांनी सांगितले आहे.

श्रीगणेशोत्सवात कुळाच्या परंपरेनुसार गौरी तथा महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात येते. याच परंपरेची नाळ भोंडला, हादगा आणि भुलाबाई या थोड्यानंतरच्या कालावधीत येणाऱ्या सणांशी जोडलेली आहे. तद्वतच उन्हाळ्यात आखाजीला होणारा गौराई सण बागलाण व खान्देशात गौरी सणाशी साधर्म्य सांगणारा आहे, असे मत अभ्यासक व्यक्त करतात.

कुलपरंपरेनुसार कोणी धातूूची, कोणी मातीची प्रतिमा बनवन पूजा करतात. तर काही ठिकाणी कागदावर देवीचे चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे. काही कुटुंबात नदीकाठावरील पाच लहान खडे आणून त्यांची स्थापना करून गौरी म्हणून पूजा करतात.

कोकणात या सणाला मुली माहेरी जातात. तर विदर्भ-मराठवाड्यात मात्र हा सण सासुरवाशिणींचा मानला जातो. गौरी गणपती घरी येणे म्हणजे एकप्रकारे सुख-समृद्धी येणे असे मानले जाते. गौरी आगमनापूर्वी आदल्या दिवशी घराची साफसफाई करण्यात येते. कोळी समाज बांधवांचा गौराई सणकोकणातील कोळी समाजबांधव याला गौरी मातेचा (आईचा) सण मानतात. म्हणून तिला ‘गौराई इलो’ म्हणजे गौरी माता आली असे म्हटले जाते.

या समाजात गौरी बसविण्याची प्रथा थोडी निराळी आहे. भाद्रपद समाप्तीच्या दिवशी सायंकाळी महिला तेरड्याच्या झाडाची एक फांदी गौरीच्या रूपाने वाजत-गाजत घरी आणतात.

तसेच पाचोरा शहरातील मोघे ब्राम्हण घराणे आपल्या अनेक पिढ्या पासुन ही रूढी परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी करतात आणि आपल्या घरी ही पूजा विधी ठेऊन आपल्या शहरातील भाविक भक्तांना आमंत्रण देऊन गौरी गणपती पुजन याचे दर्शन घ्यायला लावतात. मोघे ब्राम्हण याचे कुटुंब ही संपूर्ण पूजा विधी शास्त्रोक्त विधीवत पद्धत्तीने संपूर्ण पूजा विधी केली जाते.

आणखी संबंधित बातम्या

Jalgaon News : पाचोऱ्यात उष्माघाताने फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

2026-04-30 21:45:04

Jalgaon News : पाचोऱ्यात उष्माघाताने फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Rabi Season: पारोळ्यात रब्बी भरडधान्य नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड; नियोजनाअभावी गैरसोय

2026-04-07 19:51:03

Rabi Season: पारोळ्यात रब्बी भरडधान्य नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड; नियोजनाअभावी गैरसोय

पाचोरा येथे उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा; विकासाच्या विविध योजनांची घोषणा

2025-11-28 21:17:06

पाचोरा येथे उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा; विकासाच्या विविध योजनांची घोषणा

Maharashtra Politics : महायुतीत मिठाचा खडा पडला! 'या' आमदाराने दिला 'स्वबळाचा' नारा

2025-10-30 19:26:22

Maharashtra Politics : महायुतीत मिठाचा खडा पडला! 'या' आमदाराने दिला 'स्वबळाचा' नारा

नेवासा: वरखेड नगरीत महालक्ष्मी मातेचा जयघोष

2025-05-06 20:51:13

नेवासा: वरखेड नगरीत महालक्ष्मी मातेचा जयघोष