गौहर खान वयाच्या ४२ व्या वर्षी दुसऱ्यांदा झाली आई; शेअर केली खास पोस्ट

Gauhar Khan | अभिनेत्री गौहर खान वयाच्या ४२ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दोघांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
गौहर खानची प्रसूती 1 सप्टेंबर रोजी झाली. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत. गौहरने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. Gauhar Khan |
View this post on Instagram
गौहर आणि जैदनं त्यांच्या पोस्टमध्ये दोन लहान बछड्यांसह सिंह आणि सिंहिणीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, “1 सप्टेंबर 2025 रोजी जन्मलेल्या त्याच्या लहान भावासोबत त्याचं साम्राज्य शेअर करताना जेहान खूप आनंदी आहे. आमच्या आनंदी कुटुंबासाठी सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद शुभेच्छा. कृतज्ञ आणि खूप खूप आनंदी पालक, जैद आणि गौहर…” त्याच्या या पोस्टवर अनेकांकडून अभिनंदन करण्यास सुरुवात केली. Gauhar Khan |
गौहर खान व झैद दरबार यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी मुंबईत त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. गौहर पती झैदपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांचा मुलगा जेहानचे स्वागत केले. त्यानंतर जेहानच्या धाकट्या भावाचा जन्म १ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. यानंतर आता त्यांचे कुटुंब देखील खूप आनंदात आहे. Gauhar Khan |
हेही वाचा:





