Gas Cylinder Price: महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका! गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ
Updated On:

Gas Cylinder Price – सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या दरानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांची वाढ कर.यात आली आहे.
त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याची झळ सर्वसामान्यांनाही बसणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या नवीन दरानुसार, आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.





