नांदेड सिटी गेटबाहेर कचऱ्याचे साम्राज्य

सिंहगडरस्ता : नांदेड सिटीच्या गेटबाहेर नागरिकांकडून उघड्यावरच कचरा टाकला जात असल्याने घाण आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेक दिवसांपासून हा कचरा उचलण्यात न आल्याने परिसरात दुर्गधी पसरली आहे.
महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे परिसर बकाल झाला असून नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर कचरा सडण्याची आणि पाण्यासोबत तो रस्त्यावर पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.
सध्या आमच्याकडे गाड्यांची कमतरता आहे. त्यामुळे मर्यादा येत आहे. मात्र, हा कचरा लवकरात लवकर हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यात येईल.
– अजय जगधने (निरीक्षक, आरोग्य विभाग, महानगरपालिका)





