Ganpati Visarjan 2024 | आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान , मानाच्या गणपतींसह शहरातील घरगुती गणपतींचे विसर्जन देखील उत्साहात पार पडत आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविक श्री गणेशाला विधीपूर्वक निरोप देतात. चतुर्थी तिथीलाच पूजा केल्यानंतर दीड दिवसाचा, ५ दिवसाचा, ७ दिवसाच्या आपल्या परंपरेनुसार गणेश विसर्जनही करता येते. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. चतुर्दशी तिथी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.