१४ वर्षांपासून फरार असलेला गॅंगस्टर शंकर कनौजिया चकमकीत ठार; उत्तर प्रदेश पोलिसांची कामगिरी

Shankar Kanaujia Encounter | एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गॅंगस्टर शंकर कनौजिया आजमगढमध्ये एसटीएफच्या चकमकीत मारला गेला. यावेळी शंकर कनौजियाकडची शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
आझमगढमधील या चकमकीत गॅंगस्टरकडून एक कार्बाइन, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हा गॅंगस्टर २०११ पासून म्हणजेच १४ वर्षांपासून फरार होता. त्यानंतर तो दरोडा आणि अपहरण असे गुन्हे करत राहिला.
आजमगढच्या जहानागंज पोलिस स्टेशन परिसरात शनिवारी उत्तर प्रदेश एसटीएफ आणि गॅंगस्टरमध्ये चकमक झाली. पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या शंकर कन्नौजिया पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला.
सदर आरोपी रौनापार पोलिस स्टेशन परिसरातील हाजीपूर गावचा रहिवासी होता. आझमगढच्या रौनापार पोलिस स्टेशन परिसरातील हाजीपूर गावचा रहिवासी शंकर कनोजिया हा पिकअप व्हॅनवर दरोडा टाकणे अणि खून प्रकरणात फरार होता. वाराणसी झोनचे एडीजी पीयूष मोरडिया यांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
हेही वाचा :
“मिंधेंनी मुंबईची तिजोरी धुतली”; रस्त्यावरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा





