अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार ; 28 दिवसांचा फर्लो मंजूर

Gangster Arun Gawli । अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला 28 दिवसाची फर्लो म्हणजेच संचित रजा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे. काल ही राजा मंजूर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे. याआधी अरुण गवळी याला कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता तो नामंजूर केल्याने अरुण गवळी याने नायायालयात धाव घेतली होती.त्यावरच न्यायाधीशांनी काल निर्णय दिला आहे.
गेल्या वर्षी अरुण गवळीने केला होता अर्ज Gangster Arun Gawli ।
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी अरुण गवळीने नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता. मात्र अरुण गवळीचा गुन्हेगारी जगतावरील प्रभाव पाहता आणि तो एकेकाळी गुन्हेगारी टोळीचा मोहरक्या असल्याचे कारण देत विधानसभा निवडणुकांच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन कारागृह महानिरीक्षकांनी तो अर्ज फेटाळला होता.
गवळीच्या वकिलांचा युक्तीवाद आला कामी Gangster Arun Gawli ।
कारागृह महानिरीक्षकांच्या त्याच निर्णयाच्या विरोधात अरुण गवळीने आपल्या वकिलांच्या माध्यमातून नागपूर खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेसंदर्भात नागपूर खंडपीठाने निर्णय घेत अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. या सुनावणीवेळी, गवळीचे वकील अॅड. मीर नगमान अली यांनी कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करत संचित रजा मिळावी अशी मागणी केली, यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर गवळीने प्रत्येकवेळी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केलेले आहे. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असे गवळीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.
नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेवून गवळीची याचिका मंजूर करून कारागृह उपमहानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द केला. त्याचबरोबर, अरूण गवळीचा रजा मंजूर केली आहे. अरूण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2007 मध्ये घडली होती. अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.





