Mumbai Ganesh Visarjan : : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, पहा व्हिडिओ…..
Updated On:

मुंबई – करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.
दरम्यान, दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिववणूक निघाली आहे. मिरवणूमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सामील झाले असल्याचे पाहायला मिळतेय.
मुंबई पोलिसांकडून गणपतीच्या मिरवणुकींसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय त्यामुळे मुंबईकरांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.





