\n

पारंपरिक रथाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर चारही बाजूंनी रणशिंग पुष्प चौघडा उभारण्यात आले होते. तर या रथावर कोल्ड फायरच्या माध्यमातून विद्युत आतषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे हा रथ गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

\n

\n

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बेलबाग चौकात शनिवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी दाखल झाला. येथून ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाली. लक्ष्मी रस्त्यावर ही विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार भाऊसाहेब रंगारी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिककठिकाणी नागरिकाकडून पुष्पवृष्टीही केली जात होती.

\n
\n

*Ganeshotsav 2022* :
\nगणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे….
\n👇👇👇👇👇👇https://t.co/BzoOM9zTmB#GaneshVisarjan2022 #ganeshfestival2022 #Ganeshotsav2022 #Pune #GanpatiBappaMorya

\n

— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 12, 2022

\n

\n

शनिवारी सकाळी नऊ वाजता टिळक चौकात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बापाच्या रथाचे आगमन झाले. याठिकाणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. यावेळी चौकात भाविकांची प्रचंड गर्दी आली. गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया…या जयघोषाने संपूर्ण चौक दणाणून गेला होता. त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"गणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे….","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/br.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/br.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan#webpage","name":"गणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे….","url":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/br.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ganeshotsav-2022-snapshots-of-indias-first-public-ganesha-shrimant-bhausaheb-rangari-ganesh-visarjan","name":"गणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे…."}}]}}}

गणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे….

Updated On:
गणेशोत्सव 2022 : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ विसर्जन मिरवणूकीची क्षणचित्रे….

पुणे – आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ, त्यावर उभारलेला रणशिंग पुष्प चौघडा आणि रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी, सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशांचा दणदणाट अशा दिमाखदार, अशा भावपूर्ण आणि तितक्‍यात जल्लोषात लक्षवेधक विसर्जन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.

शुक्रवारी प्रथा-परंपरेनुसार सकाळी मंडईतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्टकडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. उत्सवप्रमुख व विश्‍वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर शुक्रवारी रात्री 11 वाजता प्रत्यक्षात या मिरवणुकीला सुरवात झाली.

पारंपरिक रथाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर चारही बाजूंनी रणशिंग पुष्प चौघडा उभारण्यात आले होते. तर या रथावर कोल्ड फायरच्या माध्यमातून विद्युत आतषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे हा रथ गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बेलबाग चौकात शनिवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी दाखल झाला. येथून ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाली. लक्ष्मी रस्त्यावर ही विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार भाऊसाहेब रंगारी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिककठिकाणी नागरिकाकडून पुष्पवृष्टीही केली जात होती.

शनिवारी सकाळी नऊ वाजता टिळक चौकात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बापाच्या रथाचे आगमन झाले. याठिकाणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. यावेळी चौकात भाविकांची प्रचंड गर्दी आली. गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया…या जयघोषाने संपूर्ण चौक दणाणून गेला होता. त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

आणखी संबंधित बातम्या

Karnataka accident : कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला, ९ भक्तांचा दुर्दैवी मृत्यू! पंतप्रधान मोदी म्हणाले..

2025-09-13 15:23:15

Karnataka accident : कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला, ९ भक्तांचा दुर्दैवी मृत्यू! पंतप्रधान मोदी म्हणाले..

मी माझ्या नातवाला का संपवू? बंडू आंदेकराचा इमोशनल डाव; वकिलांचाही अजब दावा, कोर्टात काय घडलं?

2025-09-10 11:29:43

मी माझ्या नातवाला का संपवू? बंडू आंदेकराचा इमोशनल डाव; वकिलांचाही अजब दावा, कोर्टात काय घडलं?

Ayush Komkar Murder Case : दुडम काकांचा फोन आला अन्...; आयुषची आई धावत खाली गेली, मुलाला त्या अवस्थेत पाहून...; त्या दिवशी काय घडलं?

2025-09-09 09:14:27

Ayush Komkar Murder Case : दुडम काकांचा फोन आला अन्...; आयुषची आई धावत खाली गेली, मुलाला त्या अवस्थेत पाहून...; त्या दिवशी काय घडलं?

Ganesh Visarjan | १३२ वर्षांची परंपरा आणि सुवर्णरथातील बाप्पा ; अखिल मंडई मंडळाची थाटात मिरवणूक

2025-09-08 03:15:47

Ganesh Visarjan | १३२ वर्षांची परंपरा आणि सुवर्णरथातील बाप्पा ; अखिल मंडई मंडळाची थाटात मिरवणूक

Pune News | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

2025-09-08 02:30:11

Pune News | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन