Ganeshotsav 2022 : पोलीस बांधवानी घेतला मिरवणुकीत नाचण्याचा मनमुराद आनंद

Updated On:
Ganeshotsav 2022 : पोलीस बांधवानी घेतला मिरवणुकीत नाचण्याचा मनमुराद आनंद

शिक्रापूर (प्रतिनिधी) – पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करीत आनंद लुटला.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. दररोज पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांच्या हस्ते आरती करीत गणेशोत्सव साजरा केला. आता सर्वत्र गणेश विसर्जन कार्यक्रम होणार असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.8) पोलीस स्टेशनच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी सर्व पोलिसांनी फेटे बांधत गणपतीची पारंपारिक वाद्याच्या तालात मिरवणूक काढत जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, नितीन अतकरे, वैभव पवार, वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी सहभागी झाले होते.

आणखी संबंधित बातम्या

Navratri festival : कार्ला गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पहिल्या माळेला रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

2026-10-12 08:08:01

Navratri festival : कार्ला गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पहिल्या माळेला रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

CJP Protest On Delhi : आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतुकीवर निर्बंधांची शक्यता; ५७ मेट्रो स्थानके बंद ठेवण्याची पोलिसांची विनंती

2026-10-09 19:14:24

CJP Protest On Delhi : आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतुकीवर निर्बंधांची शक्यता; ५७ मेट्रो स्थानके बंद ठेवण्याची पोलिसांची विनंती

Pune News : एमपीएससी आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थी प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; रस्ता अडविल्याचा पोलिसांचा आरोप

2026-10-09 15:36:25

Pune News : एमपीएससी आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थी प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; रस्ता अडविल्याचा पोलिसांचा आरोप

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी