Ganeshotsav 2022 : पाचगणीत श्री गणेशाचे जल्लोषात आगमन; भरपावसात उत्साही स्वागत

Updated On:

पाचगणी (प्रतिनिधी) – विद्येची देवता श्री गणेशाचे आगमन पाचगणी शहरात उत्साहात करण्यात आले. करोनामुळे दोन वर्षे नागरिकांचा हिरमोड झाला असताना यंदा मात्र गणेश भक्ताचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. आपल्या लाडक्या गणेशाला मोठ्या आनंदाने नाचत गाजत आणताना कार्यकर्ते जल्लोषात पारंपरिक वादावर नाचत ,फटाक्याच्या आतषबाजीत गणरायाचे स्वागत करत होती.

पाचगणी शहरातील मानाचा गणपती म्हणून नाव असलेल्या हनुमान मंडळांच्या गणपतीची आकर्षक मिरवणूक शहरातील नागरिकांना पर्वणी होती. पर्यटकही भरपावसात मंत्रमुग्ध होऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवत होती.

पारंपरिक ढोलपथकाचा ठेका धरत अवघी तरुणाई उत्साहात गणपती बाप्पा मोरया असा घोषणा देत होती. कार्यकर्ते शिस्तीत मिरवणुका काढत असताना पोलीसांना सहकार्य करत होती.

पुस्तकाच गाव भिलार या गावामध्ये लाडक्या गणेशाचं आगमन महिला वर्गाने पारंपरिक फेटा बांधून वाजतगाजत मिरवणूक काढून केली. पोलीस प्रसाशनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार ,पोलीस उपनिरीक्षक अरविंद माने यांच्या उपस्थितीत पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आणखी संबंधित बातम्या

Pune : लक्ष्मीच्या आगमनाने पुणे लखलखले!

2025-10-22 09:55:53

Pune : लक्ष्मीच्या आगमनाने पुणे लखलखले!

Pune District : चैतन्य विद्यालयाच्या गणरायाला विविध पथकांनी दिली मानवंदना

2025-09-03 09:02:43

Pune District : चैतन्य विद्यालयाच्या गणरायाला विविध पथकांनी दिली मानवंदना

गणरायाच्या आगमनासाठी ब्राह्ममुहूर्तापासून सर्वोत्तम मुहूर्त

2025-08-27 08:28:15

गणरायाच्या आगमनासाठी ब्राह्ममुहूर्तापासून सर्वोत्तम मुहूर्त

'श्री गणेश करेंगे…’ म्हणत रशियन राजदूतांनी पत्रकार परिषदेची सुरुवात ; 'सुदर्शन चक्र' प्रकल्पासाठी दिले मदतीचे आश्वासन

2025-08-21 11:54:37

'श्री गणेश करेंगे…’ म्हणत रशियन राजदूतांनी पत्रकार परिषदेची सुरुवात ; 'सुदर्शन चक्र' प्रकल्पासाठी दिले मदतीचे आश्वासन

पुणे जिल्हा : बारामतीत २१ हजार पोती मक्क्याची आवक

2024-11-15 08:09:37

पुणे जिल्हा : बारामतीत २१ हजार पोती मक्क्याची आवक