Ganesha Immersion: काश्मीर ते कन्याकुमारी जल्लोष; पाहा गणपती विसर्जनाचे आकर्षक फोटो

पुणे : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाले होते. गेली दहा दिवस देशभर आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर आज अनंत चतुर्दशी दिवशी देशभरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, गणपती चालला गावाला चैन पडेना जीवाला…, अशा घोषणा देत भाविक गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत. यादरम्यान गणपतीचे आकर्षक फोटो समोर आले आहेत..

मुंबई : मुंबईतील लालबाग येथे विसर्जन मिरवणुकीत गणपतीच्या मूर्तीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

अजमेर: अजमेर जिल्ह्यातील ‘गणेश चतुर्थी’ उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एका भक्ताने कृत्रिम तलावात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले.

कराड : कराडमध्ये गणेश चतुर्थी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी नाचण्याचा आनंद घेतला,

कराड : गणेश चतुर्थी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जनासाठी एका भाविकाने गणपतीची मूर्ती आणली.

सुरत: सुरतमध्ये ‘गणेश चतुर्थी’ उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत भाविकांचा सहभाग.

हैदराबाद: हैदराबादमध्ये ‘गणेश चतुर्थी’ उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याच्या मिरवणुकीत भाविक सहभागी झाले आहेत.

आग्रा: आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालाजवळ गणेश चतुर्थी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जनासाठी भाविक गणपतीची मूर्ती घेऊन जातात त्यावेळची दृष्य






