Nagar | आमदार थोरातांच्या हस्ते गणेश मंडळाच्या आरती

संगमनेर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या संगमनेर शहरात पौराणिक, ऐतिहासिक व विविध आकर्षक देखाव्यांसह गणेश मंडळांनी मोठी आरस केले आहे.
हे आरस पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहर व ग्रामीण भागात विविध गणेश मंडळाच्या आरतींना भेट दिली. याचबरोबर या गणेशोत्सवाच्या आनंदपर्वातून समतेची भावना वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
संगमनेर शहरात आमदार थोरात यांच्याहस्ते विविध ठिकाणी गणेश मंडळांची आरती झाली. संगमनेरमध्ये सर्वांनी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा केला आहे. गणेश विसर्जन करताना तरुणांनी अति उत्साह न दाखवता दुर्घटना टाळण्यासाठी संयम बाळगावा.
पर्यावरण पूरक व स्वच्छतेचा संदेश देणारा या वर्षीचा गणेश उत्सव ठरावा, असेही ते म्हणाले.डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने 300 स्वयंसेवक निर्माल्य संकलन व विसर्जनासाठी सर्व नागरिकांना मदत करणार आहेत.
तरुणांनी नदीकाठी विसर्जन करताना अति उत्साह व पाण्यात जाऊन सेल्फीसाठी जास्त धाडस करू नये, असे आवाहन केले. प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आ. बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत सेल्फी व फोटो घेण्यासाठी तरुणांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.




