पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल ‘इतके’ तास चालली मिरवणूक

Updated On:

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सर्वाधिक चर्चेत असते. मोठ्या संख्येने येथे लोक गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येतात. काल (गुरुवारी) सकाळी सुरू झालेली पुण्यातील पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अखेर संपली आहे. तब्बल 28 तास 40 मिनिटांनंतर गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या…’ म्हणत गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात निरोप देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पुण्यातील गणपती मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पाडावी हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असते. ते योग्यरित्या पोलिसांनकडून पार पडल्याचे देखील पाहायला मिळाले. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, “या वर्षी मिरवणूक 28 तास 40 मिनिट चालली. यंदाच्या मिरवणुकीत काही मंडळांनी चांगला सहकार्य केले आहे. मात्र काही मंडळांनी 10 मिनिटांपेक्षा जास्त ढोल ताशा वाजवले. लोकांच्या भावना असतात त्यामुळे त्यांना थांबू शकत नाही. ”

यंदा 3600 मंडळांनी या मिरवणुकीत सहभागी घेतला होता. तर महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात आज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी झाली यानंतर पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची अधिकृतरित्या सांगता झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अडीच तास लवकर संपली आहे. 2022 मध्ये 31 तास गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. यंदा ही मिरवणूक 28 तास 30 मिनिटे चालली.

यावर्षी पहिल्यांदाच श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी 4 वाजता सुरु झाली आणि पावणे नऊ वाजता संपली. आतापर्यंत या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी केले जात होते.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका