Ganesh festival 2025 : गणेशोत्सवात कोटयवधींची आर्थिक उलाढाल; राज्यसरकारला होणार मोठा फायदा

Ganesh festival 2025 – गणेशोत्सव काळा एकूण ४५ हजार कोटींच्या उलाढालीपैकी ६० टक्के उलाढाल फक्त महाराष्ट्रात होणार असल्याचा अंदाज कॉन्फन्ड्रेट ऑफ इंडियन ट्रेडर्सने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव आता देशभर पसरत असून त्याचा थेट परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने यावर्षी गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रातील आर्थिक उलाढाल दुप्पट होईल असाही जाणकारांचा अंदाज आहे.
ही आर्थिक उलाढाल प्रामुख्याने मूर्ती खरेदी, मंडप उभारणी, सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, उत्सवात लागणाऱ्या सामानाची खरेदी, वाहन आणि घर खरेदी, आणि संबंधित व्यवसायात होणाऱ्या खरेदी विक्रीमुळे होणार असल्याचे सिएआयटीने म्हटले आहे. या उलाढालीचा फायदा फक्त व्यावसायिकांनाच नाही तर अनेक कलाकारांना फायदेशीर ठरणार आहे. फक्त गणेश चतूर्थीच्या दिवशीच सुमारे २५ हजार कोटींची उलाढाल झाली असवी असा अंदाज आहे.
तर घरगूती गणेशोत्सवांचाही मोठा वाटा या उलाढालीत आहे. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे नागरिकांकडून वस्तू व सेवा कर कमी होण्याची वाट न पाहता मनसोक्त खरेदी केली गेली असल्याचे दिसते. ज्या प्रमाणात यावर्षी खरेदी झाली आहे, ते पाहता दिवाळी, दसरा आणि गुढीपाडव्याच्या यादीत आता गणेशोत्सव गेला असल्याचे दिसते.
खर्चाचा क्षेत्र निहाय अंदाज (सरासरी)
कार्यक्रम व्यवस्थापन – ५००० कोटी
वस्तूंचा व्यापार – ३००० कोटी
खाद्यपदार्थ आणि मिठाई – ५००० कोटी
मूर्ती विक्री – ५०० कोटी
मंडप – १०,००० कोटी
वाहन खरेदी – ५०० कोटी
छपाई काम – ५०० कोटी
वाहतूक – १,००० कोटी
सांस्कृतिक कार्यक्रम – २५० कोटी





