Ganesh Chaturthi 2025: टीव्हीवर गाजलेले गणेशाचे अवतार; कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने

Ganesh Chaturthi 2025: देशभरात २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. जसा बाप्पाचा उत्सव आपल्या जीवनाचा भाग आहे, तसाच त्यांचा प्रभाव चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्येही दिसून येतो. अनेक कलाकारांनी लहान पडद्यावर बाप्पाचे रूप साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘विघ्नहर्ता गणेश’
या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकार उजैर बसरने युवा गणेशाची भूमिका केली होती. हा शो २२ ऑगस्ट २०१७ ते १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला. आकांक्षा पुरी आणि बसंत भट्ट यांसारख्या कलाकारांनी मालिकेला आणखी खास बनवलं.
‘गणपती बाप्पा मोरया’ (मराठी शो)
स्वराज येवले आणि आदिश वैद्य यांनी गणेशाची भूमिका साकारली होती. माता पार्वती आणि पुत्र गजाननाच्या नात्यावर आधारित ही मालिका तब्बल ५३९ भाग चालली आणि खूप लोकप्रिय झाली.
‘जय मल्हार’
भगवान खंडोबाच्या कथांवर आधारित या मालिकेत शनय भिसेने गणेशाची भूमिका केली. देवदत्त नागे आणि सुरभि हंडे यांसारख्या कलाकारांनीही यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
‘जय देवा श्री गणेश’
यात अद्वैत कुलकर्णीने बाल गणेश तर अजिंक्य ठाकुरने मोठा गणेश साकारला. गणेशोत्सव २०२० मध्ये सुरू झालेली ही मालिका फक्त ११ दिवसांत संपली.
‘श्री गणेश’
दिवंगत अभिनेते जागेश मुकाती यांनी या मालिकेत बाप्पाचे रूप साकारत लोकप्रियता मिळवली. धीरज कुमार दिग्दर्शित या शोमध्ये गणेशकथांचा सुंदर आढावा घेण्यात आला.
‘गणेश लीला’
या मालिकेत आकाश नायरने गणेशाची भूमिका केली आणि प्रेक्षकांवर छाप सोडली.
‘देवो के देव महादेव’
या प्रसिद्ध मालिकेत वेगवेगळ्या कलाकारांनी गणेशाची भूमिका साकारली. साधिल कपूर, अल्पेश ढाकन आणि एहसान भाटिया यांनी बाप्पाचे रूप घेतले. यात महादेवाची भूमिका करणारा मोहित रैना घराघरात प्रसिद्ध झाला.
ह्या सर्व मालिकांमधून आणि चित्रपटांमधून गणेशभक्तांना बाप्पाच्या विविध कथा आणि रुपांचे दर्शन घडले. म्हणूनच आजही बाप्पाचे हे टेलिव्हिजनवरील ‘अविस्मरणीय रूप’ प्रेक्षकांच्या आठवणीत कायम आहे.




