मुंबई – सलमान खानच्या ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शोचे दोन प्रोमोही समोर आले आहेत. आता उत्सुकता आहे ती यामध्ये कोण कोण झळकणार याची. मिळालेल्या माहितीनुसार, गंदी बात फेम फ्लोरा सैनीही यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. फ्लोरा सैनी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होतात.
फ्लोराला ओटीटी क्वीन म्हणूनही ओळखले जाते, तिने गंदी बात, सिटी ऑफ ड्रीम्स, मेड इन इंडिया, इनसाइड एज या चित्रपटांमध्ये तिच्या बोल्डनेसची अदा सर्वांना दाखवली होती. म्हणूनच फ्लोरा बिग बॉसमध्ये झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नुकतेच या शोचे दोन प्रोमो समोर आले, जे पाहून यावेळची थीम काय असेल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही.
View this post on Instagram
बिग बॉस हा शो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी राज कुंद्रा, मुनव्वर फारुकी, कनिका मान, ट्विंकल कपूर, शिवीन नारंग हे स्पर्धक शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप कोणत्याही स्पर्धकाच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु हा वादग्रस्त रिअॅलिटी शो पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.