“गजरा, बिंदी अन्…” जिनिलीया देशमुखचा खास लुक

Genelia Deshmukh | अभिनेत्री जिनिलीया देशमुख अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. जिनिलीयाचा मोठा चाहता वर्ग आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. नुकतंच जिनिलीयाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.
जिनिलीयाने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने डिझायनर ओढणी घेतली आहे. कानात मोठे खड्यांचे कानातले आणि तिने केसांत गजरा माळला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
View this post on Instagram
या फोटोंना जिनिलीयाने “गजरा, बिंदी, हाथफूल, अनारकली और मै मेरी फेव्हरेट हूँ”, असं कॅप्शन दिलं आहे. जिनिलीयाच्या या फोटोंचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. Genelia Deshmukh |
दरम्यान, जिनिलीया ‘सितारे जमीन पर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात जिनिलीयासोबत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खान झळकणार आहे. ‘सितारे ज़मीन पर’ 20 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. ‘तारे जमीन पर’ या 2007 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल ‘सितारे जमीन पर’ आहे.Genelia Deshmukh |
हेही वाचा:





