#INDvSA : ऋतुराजला संधी मिळणे कठीण? गिलसोबत कोण येणार सलामीला? जाणून घ्या,पहिल्या T20 मध्ये कसं असेल भारताचे Playing 11

India Playing 11 Vs South Africa 1st T20 : ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना आज डरबनमधील किंग्समीड येथे संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसरा T20 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 14 डिसेंबरला खेळवला जाईल. जाणून घ्या…पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकते.
ऋतुराज गायकवाडला संधी मिळणे कठीण…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत शतकासह सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये संधी मिळणे कठीण आहे. खरे तर शुभमन गिल या मालिकेतील संघाचा एक भाग आहे. अशा स्थितीत तो डावाची सुरुवात करेल. त्याचवेळी त्याच्यासोबत तुफान फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. वास्तविक, हा निर्णय डाव्या आणि उजव्या हाताच्या संयोजनाखाली घेतला जाऊ शकतो.
जितेश शर्मा असेल यष्टिरक्षक …
श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. यानंतर रिंकू सिंग आणि जितेश शर्मा खेळू शकतात. जितेश यष्टिरक्षक म्हणून खेळणार आहे. या मालिकेत फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल संघाचा भाग नाही. अशा स्थितीत रवींद्र जडेजा त्याच्या जागी सातव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला गोलंदाज रवी बिश्नोई जडेजासोबत पहिल्या टी-20 मध्ये दिसू शकतो. अशा स्थितीत कुलदीप यादवचे खेळणे खूप कठीण आहे.
या तीन वेगवान गोलंदाजांना मिळू शकते संधी …
मोहम्मद सिराज संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो संघाचा भाग आहे. त्याच्यासोबत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग असेल. अर्शदीप आणि सिराज नव्या चेंडूने गोलंदाजी करू शकतात. याशिवाय डेथ ओव्हर्समध्ये मुकेश कुमार दिसणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या T20 मध्ये या तीन वेगवान गोलंदाजांचा अंतिम अकरामध्ये समावेश करू शकतो.
पहिल्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मुकेश कुमार/दीपक चहर, रवी बिश्नोई, मोहम्मद अरदीप सिंग आणि सिराज .





