सातारा – पाटण तालुक्यातील विकासकामांना सव्वा सहा कोटींचा निधी मंजूर

सणबूर -पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी एकूण सहा कोटी 56 लाख 48 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रस्ता सुधारणेमध्ये बामणेवाडी, जिमनवाडी, बागलवाडी, भोकरवाडी-जळव रस्ता सुधारणा 50 लाख, लुगडेवाडी 50 लाख,
दुधडेवाडी-मरळी 20 लाख, रामिष्टेवाडी-काळगाव रस्ता सुधारणा 30 लाख, वरचे केर-खालचे केर 50 लाख, तर कब्रस्तान संरक्षक भिंत पाणेरी व धावडवाडा रस्ता सुधारणा 15 लाख, पेठशिवापूर इदगाह मैदान संरक्षण भिंत 15 लाख, सातेवाडी-नाटोशी कब्रस्तान 15 लाख, ढेबेवाडी रस्ता सुधारणा 15 लाख चाफेर 15 लाख, हेळवाक 15 लाख, काढोली 10 लाख, तसेच अंगणवाडी इमारती बांधकामामध्ये डोंगळेवाडी खालची,
लेंढोरी धनगरवाडा, कोरिवळे, शिबेवाडी वरची, तळीये पश्चिम, धनगरवस्ती वाजेगाव, शेळकेवस्ती मारुल तर्फ पाटण 78 लाख 75 हजार, जांभेकरवाडी (मरळोशी साकव 38.29 लाख, धजगाव -शिंदेवाडी साकव 34.28 लाख, मरड-मिसाळवाडी साकव 53.25 लाख, शिद्रुकवाडी-मुगडेवस्ती रस्त्यावर साकव 49.98 लाख, चाफळ काटेवस्ती-खिळेपट्टी साकव 51.95 लाख, तारळे बौध्दवस्ती साकव 49.98 लाख निधी मंजूर झाला आहे.





