Pune District : पशुवैद्यकीय दवाखान्याला १८ लाखांचा निधी मंजूर

वाल्हे : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जीर्ण अवस्थेत असलेली इमारत दुरुस्तीसह, सुशोभीकरणाच्या कामांसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी जीर्ण इमारतीच्या छताला लागलेली गळती तसेच रंगरंगोटीसह इतर सुविधांच्या अभावामुळे दवाखान्यात काम करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तसेच जनावरांच्या उपचारासाठी येणाऱ्या पशुपालकांना देखील गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
मात्र, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दुर्गाडे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला इमारत दुरुस्तीसह सुशोभीकरणाच्या कामासाठी भरीव निधी मिळाल्याने पशुपालकांसह ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. यावेळी प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सागर भुजबळ, माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, दिलीप थोपटे, सागर भुजबळ, दादासाहेब मदने, अमित पवार, सतीश पवार, हरीश दुबळे, विक्रम थोपटे, विजयसिंह पवार, शिरीष नवले, डॉ. ऋतिक भुजबळ, सचिन दोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.





