Dhamaal 4 Trailer : पुन्हा धमाल! जुन्या गँगसोबतच नवीन चेहऱ्यांची एंन्ट्री; ट्रेलर पाहून पोट धरून हसाल
Dhamaal 4 Trailer : मात्र, हा प्रवास जंगल, समुद्र आणि अनेक रोमांचक ठिकाणांमधून जात असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा धमाल अनुभवायला मिळणार आहे.

Dhamaal 4 Trailer : बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा पुन्हा एकदा जोरदार बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘वेलकम टू द जंगल’नंतर आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या धमाल 4 चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रेलरमध्ये भरपूर विनोद, थरार आणि भन्नाट प्रसंगांची मेजवानी पाहायला मिळत आहे. (Dhamaal 4 Trailer)
यावेळी ‘धमाल’ची मूळ टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा हे कलाकार एका नव्या खजिन्याच्या शोधासाठी निघाल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. मात्र, हा प्रवास जंगल, समुद्र आणि अनेक रोमांचक ठिकाणांमधून जात असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा धमाल अनुभवायला मिळणार आहे. (Dhamaal 4 Trailer)
ट्रेलरमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अजय देवगणचा डॉल्फिनवर स्वार होतानाचा सीन. दुसरीकडे रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांची भन्नाट केमिस्ट्री पुन्हा एकदा हशा पिकवताना दिसत आहे.
या चित्रपटात भोजपुरी सुपरस्टार रवी किशन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून त्याचा ‘देशी जॅक स्पॅरो’ लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची हटके स्टाइल आणि आगळीवेगळी व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवत आहे. (Dhamaal 4 Trailer)
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबतच काही नवे चेहरेही दिसणार आहेत. ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये आणि विजय पाटकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. (Dhamaal 4 Trailer)
खरंतर हा चित्रपट मे जूनच्या आसपास रिलीज करण्यात येणार असल्याची सांगण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान अनेक मोठे चित्रपट रिलीज झाल्याने धमाल 4 ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. मोठ्या चित्रपटांशी बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असून आता अखेर धमाल 4 हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (Dhamaal 4 Trailer)
हेही वाचा : Gold-Silver Rate: सोन्याचे भाव पुन्हा वाढले तर चांदीही झाली महाग ; भाववाढ का झाली? वाचा





