Posted by Ajay Devgn : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘इश्क’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो काजोलला मिठी मारताना दिसत आहे. या फोटोला अजयने सुंदर कॅप्शन दिले आहे. “इश्क हुआ.” असे त्याने लिहिले आहे. दुसरा फोटो हा काजोल आणि अजय यांच्या लग्नसमारंभातील आहे. या फोटोत अजय-काजोल वधू-वराच्या जोडप्यात दिसत आहे. या फोटोला अजयने “हे कसे घडले?” असे कॅप्शन दिले आहे, तर तिसऱ्या फोटोमध्ये अजयचे कुटुंब दिसत आहे. या फोटोत तो स्वतः, काजोल आणि त्यांच्या दोन्ही मुले दिसत आहे. या फोटोला अजयने चांगले झाले असे कॅप्शन दिले आहे. View this post on Instagram A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) “जे काही झाले ते चांगले आहे. प्रेमाची २८ वर्षे उलटून गेली.” असेही अजयने पोस्टमध्ये म्हटले आहे. अजय देवगणच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक केल्या आहेत. अजय देवगणने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये काजोलशी लग्न केले. २००३ मध्ये काजोलने पहिली मुलगी न्यासाला जन्म दिला. त्यानंतर २०१० मध्ये काजोलने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव युग आहे. दोघेही त्यांच्या वैवाहिक आणि कुटुंबिक जीवनात आनंदात जगत आहेत. इश्क या चित्रपटात आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांनी एकत्र काम केले होते. प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. हेही वाचा : व्लादिमिर पुतीन यांचे भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर ; पंतप्रधानांसह ‘या’ नेत्यांसोबत होणार बैठक