चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी करणारा फरार सराईत जेरबंद

खडकी: चारचाकी, दुचाकी गाड्या चोरायाच्या. त्या गाड्या वापरून जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईतास जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईतास खडकी पोलिसांनी जेरबंद केले. तो आठ महिन्यापासून फरार होता.
अंकल उर्फ सुशांत जॉन पंडीत (वय,32,रा.सैनिक हैसिंग सोसायटी,औरंगाबाद,सध्या. पिंपळेगुरव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहने असा 13 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 ऑक्टोंबर 2019 रोजी सुशांत सहाय हे दिल्लीहुन पुणे विमानतळावरुन उतरुन कॅबने हिंजवडी येथे चालले होते. त्यावेळी कॅबला तवेरा गाडी आडवी लावुन त्यांच्याजवळील मोबाईल,टॅब, रोख रक्कम आणि हार्डडीस्क असा 79,000/रुपयांचा ऐवजाची जबरी चोरी करण्यात आली.
या गुन्हाचा तपास खडकी पोलीस करत असताना सीसीटीव्ही,तांत्रिक पुरावे आणि खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन हा गुन्हा शाहीद सिराज कुरेशी, सुनिल उर्फ लाली राजु शेट्टी, सन्नी प्रवीण चिवे,अर्शद सय्यद, अंकल उर्फ सुशांत पंडीत, तरुण पिल्ले आणि इतर दोन अल्पवयीन बालकांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मात्र, अंकल हा फरार होता. दरम्यान तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी आणि पोलीस नाईक किरण घुटे यांना आरोपी हा महादेव घाट, खडकी बाजार येथे असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंकल याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अनेक गुन्हे दाखल आहेत.
सहाय्य्क पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, प्रभारी पोलीस निरीक्षक शफील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश तापकीर,पोलीस हवालदार, उत्तम कदम, सोपान ठोकळ, संतोष सावंत, पोलीस नाइक, राजकिरण पवार, गणेश लोखंडे, किरण घिटे, प्रविण कराळे, पोलीस शिपाई संदिप गायकवाड, अनिरुध्द सोनवणे, गणेश चेमटे यांनी ही कामगिरी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत





