शेतकरी आंदोलन ते बॉलीवूडमधील घराणेशाही; जाणून घ्या कंगणाची आतापर्यंत वादग्रस्त विधाने

Kangana Ranaut | बॉलीवूड अभिनेत्री कंगणाने राणावत अभिनयासह राजकारणात देखील प्रवेश केला आहे. हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदार संघासाठी तिला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर तिचा येथून विजय झाला. मात्र कंगणा नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे.
नुकतेच एका मुलाखतीदरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, लटकवले जात होते, असे विधान कंगणाने केले. मात्र यापूर्वीही वादग्रस्त विधानामुळे कंगणावर टीका करण्यात आली आहे. Kangana Ranaut |
महिला CISF ने कंगनाला कानाखाली लगावली
कंगना 6 जून रोजी चंदीगड विमानतळावर पोहोचली होती, त्यादरम्यान एका महिला CISF ने कंगनाला कानाखाली मारली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तिने चापट मारल्याचे कारण सांगितले होते. “कंगनाने शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी माझी आई त्या आंदोलनात सहभागी झाली होती,” असे त्या महिलेने म्हटले होते. Kangana Ranaut |
1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून होते
खासदार कंगनाने11 नोव्हेंबर 2021 रोजी एका कार्यक्रमात असे विधान केले होते की, भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते, भारताला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. कंगनाच्या या वक्तव्यानंतर लोकांनी तिला सर्वत्र ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तिच्या या वक्तव्यावरुन राजकारण सुरू झाले. 2014 साली भाजपच्या हातात सत्ता होती आणि त्यावेळी कंगना खासदार नसून पक्षाची समर्थक होती.
मुंबई पीओकेसारखी वाटते
कंगनाने 2020 मध्ये मुंबईबाबत वादग्रस्त विधानही केले होते, तिला मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याचे तिने म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की, संजय राऊत यांनी मला धमकावले आहे आणि मला मुंबईत परत न जाण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या आणि आता इथे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई पीओकेसारखी वाटते. त्याच्या या विधानाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती.
चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवर भाष्य
2017 मध्ये जेव्हा कंगना रणौत ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये गेली होती, तेव्हा चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवर चर्चा झाली होती. कंगना बॉलीवूड इंडस्ट्रीच्या खूप विरोधात आहे आणि ती अनेकदा घराणेशाही, चित्रपट माफिया, बाहेरील व्यक्ती, पुरस्कार याविषयी विधाने करते.
कंगनाने नुकतेच किंग खानबद्दल वक्तव्य केले होते आणि किंग खानपेक्षा माझा प्रवास अधिक कठीण असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी डोंगरातल्या गावातून आलेली आहे, मी मुलगी आहे आणि लहान वयातमुंबईत आले. त्यामुळेच माझा प्रवास अधिक कठीण झाला आहे, तर शाहरुख खान दिल्लीहूनच मुंबईत आला आहे.
दरम्यान, कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे, ज्याचा काँग्रेस पक्ष जोरदार विरोध करत आहे.





