भयंकर..! महिला प्रध्यापिकेने कारला हलकासा स्क्रॅच पडल्याने, गरीब फळविक्रेतीच्या हातगाडीच केलं नुकसान, व्हिडिओ व्हायरल

भोपाळ : एक शिक्षक नेहमीच विद्यार्थांना चांगले शिकवण देत असतो. मात्र भोपाळमध्ये शिक्षकाकडूनच चुकीचे कृत्य झाले आहे. एका महिला प्रोफेसरने आपल्या कारला हलकासा स्क्रॅच पडला म्हणून एका गरीब फळविक्रेत्याच्या पोटावर लाथ मारली आहे. या घटनेचा सोशलवर व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला असून युजर्स कडून संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये फळविक्रेता हातगाडी चालवत नेताना त्याची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला टक्कर लागली. ही कार महिला प्राध्यापिकेची होती. कारला हातगाडी धडकल्याचं कळताच तिचा संताप अनावर झाला. ती रागात बाहेर आली आणि फळविक्रेत्यावर तुटून पडली. या महिलेने गाडी वरील सर्व फळे फेकून दिली तसेच गाडीला पाडले. त्या फळविक्रेत्याने असे करण्यास महिलेला रोखले असता तुफान भांडण झाले.
ते उपस्थित लोकांनी जेव्हा या घटनेचा व्हिडियो काढण्यास सुरुवात केली त्यावेळी या महिलेने कार सुरु करून तेथून पळ काढला सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल होत असून सर्व स्थरातून या महिलेवर टीका केली जात आहे.





