Harbhajan Singh | फ्रान्सच्या विद्यापीठाची हरभजनला मानद डिग्री
Updated On:

दुबई – फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात भारताची माजी फिरकीपटू हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील मानद डिग्री जाहिर केली आहे.
विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट देते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये हरभजन सिंग कोलकाता नाइट रायडर्सच्या “बायो-बबल’मध्ये आहे.यामुळे तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही.
41 वर्षीय हरभजन म्हणाला, जर एखादी संस्था सन्मान देत असेल तर तुम्ही ती अत्यंत विनम्रपणे स्वीकारता. जर मला विद्यापीठाची मानद क्रीडा डॉक्टरेट डिग्री मिळाली असेल तर याचे कारण मी क्रिकेट खेळतो आणि लोकांनी त्याबद्दल त्यांचे प्रेम आणि आपुलकी दिली आहे. ही डिग्री मिळाल्याचा मला आनंद असल्याचे त्याने सांगितले.




