फ्रेंच ओपन टेनिस : स्विटेककडून हालेपला पराभवाचा धक्का
Updated On:

पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रुमानियाची अव्वल खेळाडू सिमोना हालेपचे आव्हान संपुष्टात आले आहे. चौथ्या फेरीत तिला पोलंडच्या इगा स्विटेकने 6-1, 6-2 असे पराभूत केले व उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अन्य सामन्यात नेदरलॅंडच्या बेर्टेन्सने कॅटरिना सिनियाकोव्हाला 6-2, 6-2 असे पराभूत करत चार वर्षांनी या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीत स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाला पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात ह्युुगो गॅस्टनकडून 2-6, 6-3, 6-3, 4-6, 6-0 असा पराभव पत्करावा लागला.





