French Open 2024 : इगा स्विटेकची तिसऱ्या फेरीत धडक; नाओमी ओसाकावर संघर्षपूर्ण विजय…

French Open 2024 (Naomi Osaka vs Iga Swiatek) : फ्रेंच ओपनचा उत्साह आता चाहत्यांमध्ये ओसंडून वाहत आहे. ही स्पर्धा पुढील फेरीत जात असल्याने खेळाडूंमधील स्पर्धा अधिकच रोमांचक होत आहे. या मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली खेळाडू आणि दोन वेळची गतविजेती इगा स्विटेकने (Iga Swiatek) महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अनुभवी नाओमी ओसाकाचा (Naomi Osaka) तीन गेममध्ये पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्विटेकने बुधवारी रात्री दुसऱ्या फेरीत एक मॅच पॉइंट वाचवला आणि त्यानंतर शेवटच्या पाच गेम जिंकून माजी जागतिक नंबर वन ओसाकाचा 7-6, 1-6, 7-5 असा पराभव केला. दोघींमधील सामना हा तब्बल 3 तास चालला.
French Open 2024 : लाल मातीचा सम्राट नदालवर पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रोमांचक सामने पाहायला मिळाले. याच प्रकारात दुसरीकडे, 8व्या मानांकित ओन्स जेबूरनेही तिसरी फेरी गाठली. ट्युनिशियाच्या जेब्युरने कोलंबियाच्या कॅमिला ओसोरिओचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव केला.





