French Open Badminton 2024 : सात्विक-चिराग विजयी धडाका कायम…

French Open Badminton 2024 – भारताची दुहेरीतील मानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत #FrenchOpen2024 यशाचा आलेख चढता ठेवला आहे. या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या मान वेई चोंग व केई वु ती या जोडीचा 21-13, 21-12 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
सात्विक व चिराग यांच्यसाठी गेल्या वर्षीपासूनचा काळ यशदायी ठरला आहे. त्यांनी चीन ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. मलेशिया सुपर स्पर्धेचे देखील उपविजेतेपद पटकावले होते. भारत 750 ओपन स्पर्धेतही त्यांनी बाजी मारली होती. त्याचवेळी ही जोडी जागतिक क्रमवारीतील दुहेरीची अव्वल क्रमांकाची जोडी ठरली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/world-olympic-qualifying-tournament-2024-boxing-indias-nishant-dev-in-the-quarter-finals/
भारताची महिला दुहेरीची अव्वल जोडी ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही या स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे. या जोडीने जपानच्या युकी फउकाशिमा व सयाका हिरोटा या जोडीचा 21-18, 21-13 असा पराभव केला व उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.





