‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहणाऱ्यांसाठी देणार मोफत रिक्षासेवा ! पुण्यातील रिक्षाचालकाची सध्या जोरदार चर्चा

पुणे – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली. या चित्रपटामधून केरळमध्ये धर्मांतराचा सर्व प्रकार समोर येणार आहे. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. असं असल तरी सोशल मीडियावर चित्रपटाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशात पुण्यातील एका रिक्षाचालक या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर करून दहशतवादाच्या आगीत फेकल्या गेलेल्या मुलींची कहाणी मार्मिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये शालिनी उन्नीकृष्णनचा केरळच्या हिंदू कुटुंबातून फातिमा बनण्यापर्यंतचा खतरनाक प्रवास दाखवण्यात आला आहे. मात्र या चित्रपटामुळे पुण्यातील आळंदी येथील एक रिक्षाचालक चांगलेच चर्चेत आले आहेत.
पुण्यातील आळंदी येथील रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर एक पोस्टर लावले आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय या रिक्षाचालकाने घेतला आहे. आळंदी परिसरातील पहील्या दहा महिलांना ते मोफत चित्रपट दाखवणार आहेत. सध्या या रिक्षा चालकाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
मुलींचे धर्मांतर त्याभोवती फिरणारे राजकरण तसेच त्यात अडकलेल्या मुलीची व्यथा तसेच तिच्या कुटुंबाला सहन करावा लागणार त्रास हे सर्व केरला स्टोरीमधून उलगडणार आहे. केरला स्टोरीमधून लापता झालेल्या 32 हजार महिलांबाबतची कहाणी सर्वांसमोर येणार आहे.हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.





