अभिनेत्री अदा शर्मा झाली नाराज

Entertainment – अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खास जागा केली. सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड बनवले. रिलीजनंतर अनेक राज्यांमध्ये बंदी आणि चित्रपटाच्या विरोधात निषेध असूनही, केरला स्टोरी आधीच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवली.
अशात नुकतेच 69वे फिल्मफेयर अवॉर्ड्स नॉमिनेशन ची घोषणा करण्यात आली यात २०२३ च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ‘द केरल स्टोरी’ नॉमिनेशन देण्यात न आल्यामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता अभिनेत्री अदा शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. अदा शर्माने नामांकन न मिळाल्यामुळे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहे.
एक चाहत्याने लिहिले आहे की,’कुठे आहे अदा शर्मा तिने २०२३ मध्ये सर्वात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट दिला असे वाटते आहे की तिने पैसे दिले नाही’
अशात अदा शर्मा चाहत्यांच्या प्रतिक्रियेवर म्हणाली,’मेकर्सने ‘द केरल स्टोरी’ मधून कमावलेला पैसा ‘बस्तर’ सारख्या चित्रपटासाठी लावण्यात येणार आहे. लोकांनी दिलेल्या प्रेमाने आम्ही जिंकलो. मी सर्व चाहत्यांचे आभार मानते. ज्यांनी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला खूप प्रेम दिले.
तर ‘द केरल स्टोरी’ चे डायरेक्टर सुदीप्तो सेनने सुद्धा प्रतिक्रिया देतांना ऑरमैक्समधील सर्वात आवडता चित्रपटाची यादी जाहीर केली. यामध्ये जवान चित्रपटानंतर दुसऱ्या नंबरवर ‘द केरल स्टोरी’ आहे.





