Aadhaar Card : आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हे’ काम करण्यासाठी उरले फक्त 24 तास

मुंबई : सध्याच्या घडीला आधारकार्ड हे ओळखपत्रासाठी महत्वाचे कागदपत्र मानले जाते. आज पॅनकार्डपासून ते बँक खात्यापर्यंत अगदी मोबाईलनंबर पर्यंत सगळीकडे आधारनंबर जोडला गेला आहे. याच आधारकार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फ्री आधारकार्ड अपडेट करण्यासाठी फक्त आणि फक्त 24 तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
UIDAI ने दिली महत्त्वाची माहिती
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख दिली आहे. तुम्ही My Aadhaar Portal वर जाऊन आधार अपडेट करू शकता. 14 डिसेंबरनंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये भरावे लागणार आहेत. तुम्हाला तुमचं आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाऊन फी भरावी लागणार आहे.
आधारमध्ये काय काय अपडेट करू शकता?
आधार कार्डवर तुमचे नाव, फोटो, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख बदलू शकता. तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल देखील बदलू शकता. या अगोदर ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. मात्र आता फक्त 24 तास शिल्लक आहेत. त्यानंतर मात्र तुम्हाला अगदी छोटे अपडेट करण्यासाठी देखील पैसे भरावे लागणार आहेत.





