चेन्टिली : आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडघशी पाडत भारताला पाठिंबा दिला आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या प्रश्नावर कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे वक्तव्य फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे.
#WATCH: France President Emmanuel Macron says, “PM Modi told me everything about Kashmir & the situation in J&K. I said Pakistan & India will have to find a solution together & no third party should interfere or incite violence.” pic.twitter.com/rU7GW62pqt
— ANI (@ANI) August 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांच्यात नुकतीच भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मॅक्रॉ यांनी सांगितले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान त्यांनी नुकत्याच जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली. तसेच हा प्रश्न भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित असल्याचे सांगितले.
#WATCH: PM Narendra Modi & French President Emmanuel Macron shake hands and hug after joint statement in Chantilly, France pic.twitter.com/fxhfB49WS9
— ANI (@ANI) August 22, 2019
त्यानंतर मी त्यांना सांगितले की, काश्मीर प्रश्नाबाबत दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. या प्रश्नावर कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, तसेच हिंसाचार होईल अशी पावले उचलता कामा नयेत.”दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल विमान करारापैकी पहिले विमाने पुढील महिन्यात भारताला देण्यात येईल, असेही मॅक्रॉ यांनी यावेळी सांगितले.