Fox Interrupt Match : लॉर्ड्सवर घडली अनपेक्षित घटना; कोल्ह्यामुळे थांबवावा लागला सामना, VIDEO होतोय व्हायरल

Fox Interrupt Match in The Hundred : इंग्लंडमधील द हंड्रेड टूर्नामेंटच्या पाचव्या हंगामाला ५ ऑगस्ट रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर लंडन स्पिरिट आणि ओव्हल इनव्हिन्सिबल्स यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली, ज्यामुळे खेळ काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. सामन्याच्या मध्येच एक कोल्हा मैदानात शिरला आणि तो मैदानावर धावू लागला. सुमारे एक मिनिट तो मैदानावर फिरत राहिला, ज्यामुळे खेळ थांबवण्यात आला. शेवटी कोल्हा स्वतःहून मैदानाबाहेर गेला. स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ओव्हल इनव्हिन्सिबल्सच्या डावादरम्यान हा कोल्हा मैदानावर आला होता. त्यावेळी डॅनियल वॉरेल लंडनकडून आठवे षटक टाकत होता. तेव्हा कोल्हा सीमारेषेजवळ धावताना दिसला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी चियर केले, पण कोणीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. सीमारेषेजवळ धावत असताना तो जाहिरात बोर्डवरून उडी मारून बाहेर गेला. यादरम्यान, सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी टी20 ब्लास्ट सामन्यादरम्यानही असाच प्रकार घडला होता, जेव्हा एक कोल्हा मैदानात शिरला होता.
There’s a fox on the field! 🦊 pic.twitter.com/3FiM2W90yZ
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 5, 2025
सामन्यात काय घडले?
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील लंडन स्पिरिटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. टॉप-३ फलंदाज कीटन जेनिंग्ज, डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. संघाकडून अॅश्टन टर्नरने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली. संघाचा एकही फलंदाज षटकार मारू शकला नाही. राशिद खानने २० चेंडूत ११ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. त्याचबबरोबर सॅम करननेही तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Mohammed Siraj : ‘तू सांगितलं का नाही…’, कर्णधार गिलवर सिराज का संतापला होता? पाहा VIDEO
३१ चेंडू राखून ओव्हल संघाने जिंकला सामना –
प्रत्युत्तरात ओव्हलच्या संघाने ३१ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. फलंदाजीला आव्हानात्मक असलेल्या या खेळपट्टीवर सलामीवीर विल जॅक्स आणि तवांडा मुयेये यांनी पहिल्या गड्यासाठी ३४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. विल जॅक्सने सर्वाधिक २४ धावा केल्या, तर डेव्हॉन फेरेराने खणखणीत षटकारासह सामना संपवला. गोलंदाजीत लियाम डॉसनने २० चेंडूंमध्ये केवळ ९ धावा देत १ गडी बाद केले. या विजयाने ओव्हल संघाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.





