सातारा जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू; नवीन ६४ जण बाधित

सातारा – जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, तर 4 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 2, सैदापूर 1, शनिवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, मर्ढे 1, देगाव 1, कोडोली 1, वर्ये 1, पळसवाडे 1, चिंचणी 1.
कराड तालुक्यातील कराड 1, ओगलेवाडी 1, सुपणे 1, विरवाडे 1, विंग 1.
फलटण तालुक्यातील पिंपळवाडी 3, सुरवडी 4, खामगाव 1, निंबळक 1, भुजबळमळा 1, निंभोरे 1, पिंप्रद 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, निढळ 3, सुर्याचीवाडी 1, मायणी 1, डिस्कळ 1.
माण तालुक्यातील म्हसवड 6, दहिवडी 1, ढाकणी 1, दिडवाघवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 1, पिंपरी 1.
जावळी तालुक्यातील जावळवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3.
पाटण तालुक्यातील निसरे 1.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,भिलार 1, अहिरे वानवली 3.
इतर वाठार 2, शिंदे वस्ती 1.
इतर जिल्ह्यातील पलुस 1.
4 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमधील कुडाळ, ता. जावळी येथील 95 वर्षीय पुरुष, कानकात्रे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, गोटेवाडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण अशा एकूण 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -259114
एकूण बाधित -52950
घरी सोडण्यात आलेले -49809
मृत्यू -1748
उपचारार्थ रुग्ण-1393





