पुणे जिल्हा | वळसे पाटील महाविद्यालयातील चार प्राध्यापकांचा सत्कार

मंचर, (प्रतिनिधी) – पारगाव दत्तात्रयनगर (ता.आंबेगाव) येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
महाविद्यालयातील पूजा पांडुरंग अरगडे (वाणिज्य विभाग),आरती दत्तात्रय अस्वारे (विज्ञान विभाग), श्रद्धा दयानंद मस्के (कला विभाग), प्रतिक विजय पानसरे (शारीरिक शिक्षण विभाग) या प्राध्यापकांनी सेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर प्रा. डॉ. शत्रुघ्न थोरात व विशेष कार्यकारी अधिकारी बी. डी. चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भीमाशंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संस्थेचे सचिव चंद्रकांत ढगे, सचिव वसंतराव जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.





