अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या चार किमी रांगा

नेवासा (प्रतिनिधी) – अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे वाहनाची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती. महामार्गावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप तर स्थानिक व्यवसायिकांना पश्चाताप करण्याची वेळ येत आहे.
अहमदनगर-मनमाड या महामार्गावरील वाहतूक श्रीरामपूर-नेवासा मार्गावर वळविण्यात आल्यामुळे नेवासा फाटा येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते.
यावेळी छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा मार्ग तर श्रीरामपूरकडे जाणाऱ्या मार्गावर दोन किलोमीटरपर्यंत आणि अ.नगरकडे जाणाऱ्या महामार्गवर चार किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी होवून महामार्ग पुरता जाम झालेला होता.
नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्वतः आंबेडकर चौकामध्ये येऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्न केले.





